रावेरात बंद घराचा दरवाजा तोडून दागिने लांबवीले

सप्टेंबर 12, 2024 3:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून चोरट्यांना खाकी वर्दीचा धाकच उरला नाहीय. अशातच रावेर येथील श्रीकृष्ण नगरात बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने २२ हजाराचे ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

chalisgaon gharfodi 44 thousand

रावेर शहराच्या श्रीकृष्ण नगरातील प्रविण सिताराम महाजन यांच्या बंद घराचे कुलूप गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. घरातील चांदीचे पैजन, चांदीच्या पाटल्या, चांदीचे जोडवे, सोन्याचे मणी असा एकूण २२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांने चोरून नेला. याबाबत प्रविण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पो.हे.कॉ. ईश्वर चव्हाण करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now