धक्कादायक ! जळगाव विद्यापीठातील वसतीगृहात विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

सप्टेंबर 11, 2024 11:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२४ । जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहात अमरावतीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रतीक विजयराव गोरडे (वय १९, रा. शिरसगाव कसबा ता. चांदूरबाजार जि. अमरावती) असे मयत तरुणाचे नाव या घटनेने एकच खळबळ उडाली. दरम्यान, याबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

pratik gorde

याबाबत असे की, जळगावच्या विद्यापीठामध्ये मुलांचे वस्तीगृह क्रमांक ३ येथे खोली क्रमांक टी ४४७ येथे प्रतीक गोरडे हा दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. तसेच विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी होते. दरम्यान बुधवारी दि. ११ सप्टेंबर रोजी मुलांनी वस्तीगृहात बसलेल्या गणपती मंडळातील आरती केली. त्यानंतर मुले जेवण्यासाठी निघून गेली.

काही वेळानंतर मुलं जेवणावरून परतली. त्यावेळेला प्रतीक गोरडे याच्या खोलीमध्ये आतून दरवाजा लावलेला दिसून आला. त्यावेळी काही तरुणांनी खिडकीची काच तोडून पाहिले तर प्रतीक याने गळफास घेतलेला होता. या वेळेला इतर विद्यार्थी धावून आले. त्यांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेत दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली. घटनेची माहिती कळताच पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान प्रतीक गोरडे यानी आत्महत्या का केली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now