बांधकामाची भिंत अंगावर पडल्याने उपसरपंचाचा मृत्यू ; पाचोऱ्यातील घटना

सप्टेंबर 11, 2024 2:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२४ । पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंचाचा बांधकामाची भिंत अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. विलास रतीलाल कुमावत (वय ३९) असं मृत उपसरपंचाचे नाव असून याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

vilas kumavat

नेमकी घटना काय?
भातखंडे खुर्द येथील विलास कुमावत हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळत स्वतः बांधकाम गवंडी काम करुन उदरनिर्वाह करीत होते. रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी पाचोरा शहरातील भडगाव रोडवर बांधकामावर गेलेल्या विलास कुमावत यांच्या अंगावर बांधकामाची भिंत कोसळली. या अपघातात विलास कुमावत हे गंभीर जखमी झाले.

त्यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्युशी झुंज देत असतानाच विलास कुमावत यांचा उपचारादरम्यान १० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास कुमावत यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now