Dharangaon : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शेतकऱ्याने उचललं नको ते पाऊल

सप्टेंबर 11, 2024 10:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२४ । कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून ४६ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथे उघडकीस आलीय. समाधान चुडामण पवार (वय ४६, रा. चोरगाव ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, यापाराकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

samadhan pawar

याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथे कुटुंबियांसह असलेले समाधान पवार हे शेतीकाम करून व मजुरी करीत ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्यावर घरासाठी घेतलेले, शेतीचे व हातउसनवारी असे विविध कर्ज होते. हे पैसे कसे फेडता येईल या विवंचनेत समाधान पवार नेहमी राहत होते.

दरम्यान, समाधान पवार यांनी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी शेताच्या शेजारी एक मूकबधिर व्यक्ती त्या ठिकाणी आला असता हि घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी समाधान पवार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now