गावठी कट्टा, चार जिवंत काडतूसासह दोघे पोलिसांच्या जाळ्यात

सप्टेंबर 5, 2024 4:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२४ । चोपडा तालुक्यात सध्या गावठी बनावटीच्या कट्ट्यांचा सुळसुळाट झाला आहे. याच दरम्यान, लासूर गावाजवळ एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतूस चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले आहे. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रतीकात्मक फोटो

श्याम राजू धनगर (२१, रा. ताडेपुरा अमळनेर) आणि चेतन ऊर्फ दत्तू किरण धोबी (१९ रा. पैलाड, अमळनेर) अशी संशयितांची नावे आहेत. चोपडा तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रोडवरील एका ढाब्याजवळ पोलिसांनी केलेल्या तपासणीत वरील दोघांच्या ताब्यातून एक कट्टा, चार जिवंत काडतूस जप्त करून संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोटारसायकलीसह ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोकॉ. विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now