सावद्यातील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये चिमकुल्या गोविंदाची धमाल

ऑगस्ट 28, 2024 5:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल मध्ये जन्माष्टमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्या गोविदांनी धमाल केली.

govinda dhamal

भारत देशात विविध सण, उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. अध्यात्मिक, धार्मिक मूल्यांचे संक्रमण झाले पाहिजे. हा त्यामागील हेतू आहे. देशाच्या भावी नागरिकांमध्ये ही मूल्य रूजवण्यासाठी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल, सावदा येथे कृष्ण जन्माष्टमी वर आधारित एका छोट्या नाटीकेचे सादरीकरण करण्यात आले.

image

त्यात भगवान श्रीकृष्ण जन्माचा देखावा इ. ३ वी व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी साकारला. त्यानंतर गोपाळकाला साजरा करण्यामागचा उद्देश्य भगवान श्रीकृष्ण यांना दही-लोणी खूप आवडायचे आणि ते मिळविण्यासाठी त्यांच्या बाल लिलांचे सादरीकरण व नृत्य सादर केले. दि. २७/०८/२०२४ या दिवशी इयत्ता ६ वी व १२ वी च्या बाल-गोपाळांनी दहीहंडीचे प्रात्यक्षिक केले. यात शाळेतील शिक्षकांचाही समावेश होता. या कार्यक्रमासाठी शाळेतील प्राचार्या, सौ. भारती महाजन मॅडम, शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा समावेश होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now