संतापजनक ! मुकबधिर अल्पवयीन मुलीचा वृद्धाकडून अत्याचार, अमळनेर तालुक्यातील घटना

ऑगस्ट 23, 2024 12:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२४ । राज्यात महिलासंह मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीय. बदलापूर येथे शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली असताना जळगाव जिल्हयातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका वृद्धाने मुकबधिर असलेल्या १२ वर्षीय मुलीचा अत्याचार केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात एका वृध्दावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 3 1 jpg webp

काय आहे घटना?
अमळनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत मुलीचे आईही मजूरी कामासाठी अहमदनगर येथे गेलेल्या होत्या. याचा फायदा घेत १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गावात राहणारा संशयित आरोपी राजधर अंबर सैंदाणे (वय ७०) याने पिडीत मुकबधिर मुलगी ही अंगणात खेळत असतांना तिला घरात बोलावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला.

हा प्रकार गावातील एका आजीने फोन करून पिडीत मुलीच्या आईला सांगितला. त्यानुसार तिची आई घरी आल्यानंतर बुधवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित आरोपी राजधर सैंदाणे या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे या करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now