पंतप्रधान दौऱ्याच्या अनुषंगाने जळगावात ‘या’वर बंदी ; जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले आदेश

ऑगस्ट 22, 2024 4:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२४ । पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव येथे ‘ लखपती दीदी ‘ कार्यक्रमाला येणार आहेत. त्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून 50 किमीच्या परिघात, “205741N”, “0753729E” आणि वरील निर्देशांकाच्या जमिनीपासून 4000 फूट अंतरावर 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत “नो फ्लाइंग झोन” म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले आहेत.

ayush prasad jpg webp

या आदेशात ड्रोन, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट्स, खाजगी हेलिकॉप्टर, पॅरामोटर, हॉट एअर फुगे इत्यादींच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या जळगाव दौऱ्याशी संबंधित महत्वाच्या/ अति महत्वाच्या विमानाचे उड्डाणे वगळता व्यवसायिक विमानांचे उड्डाण 24 ऑगस्ट रात्री 8 पासून 25 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता पर्यंत बंद करण्यात येतील असे आदेशात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now