जळगावच्या सुवर्णपेठेत २५ दिवसांनी सोने ७२ हजारांच्या पुढे, इतका वाढला भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२४ । सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विशेष रक्षाबंधन सारख्या सणाच्या दिवशी सोन्याच्या किमतीने ७२ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मागील गेल्या दोन दिवसात सोने दरात ६०० रुपयाची वाढ झालीय.
जळगावचा सुवर्णनगरीत अर्थसंकल्पानंतर २५ दिवसांनी सोने पुन्हा एकदा ७२ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. चांदीच्याही भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
गेल्या आठवड्यापासून दरवाढीचे सत्र
गेल्या आठवड्यापासून हे भाव पुन्हा वाढू लागले. त्यात अमेरिकेतील बँकांची स्थिती व इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होऊन शनिवारी सोन्याच्या भावात थेट एक हजार ६०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ३०० रुपयांवर पोहोचले. यापूर्वी २३ जुलै रोजी सकाळी सोने ७२ हजार १०० रुपयांवर होते. दुसरीकडे ८३ हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात शनिवारी एक हजार ५०० रुपयांची वाढ झाल्याने ती ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. अमेरिकेतील बँकांची स्थिती व इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम झाल्याने सोने चांदीची दरात वाढ झाल्याची सराफ व्यावसायीकांनी माहिती दिली.