सोने पुन्हा ७१ हजारापार, चांदी स्थिर ; जळगावच्या सुवर्णपेठेत आताचे भाव काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२४ । सोने आणि चांदी दरात होणारी चढ उतार कायम असून गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होत आहे. मंगळवारी त्यात ६५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा भाव पुन्हा ७१ हजारांच्या पुढे गेले आहे.. दुसरीकडे चांदीचा दर मात्र स्थिर दिसून आला.
३ ऑगस्टपासून सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले. २ ऑगस्ट रोजी ७१ हजार ५० रुपयांवर असलेले सोन्याचे भाव ८ ऑगस्टपर्यंत ६९ हजार ८०० रुपयांवर आले. त्यानंतर मात्र पुन्हा वाढ होऊन १२ ऑगस्टपर्यंत ते ७० हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. मंगळवारी त्यात ६५० रुपयांची वाढ होऊन सोने ७१ हजार २५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.
दुसरीकडे १ ऑगस्ट रोजी ८५ हजारांवर असलेल्या चांदीचे भाव ९ ऑगस्टपर्यंत ते ८० हजारांवर आले. त्यानंतर चांदीच्या भावात १० ऑगस्ट रोजी एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८१ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. तेव्हापासून चांदीचे भाव स्थिर आहेत.