जळगाव हादरले! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ऑगस्ट 7, 2024 2:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२४ । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसून अशातच जळगाव शहरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. २० वर्षीय तरुणाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 3 1 jpg webp

याबाबत असं की, पीडित मुलगी जळगाव शहरातील एक भागात राहत असून तिने एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. मार्च ते जुलै २०२४ दरम्यान वेळोवेळी मेहरुण तलाव येथील ट्रॅक जवळ आणि वाहनात वेळोवेळी फोनद्वारे बोलावून फोन मध्ये लैंगिक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्या जाचाला कंटाळून फिर्यादी तरुणीने कुटुंबीयांना माहिती दिली.

त्यानुसार मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now