जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२४ । गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने काहिशी उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले असताना आता पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील दोन तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत असून आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीय.

याच दरम्यान भारतीय हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारताच्या काही भागांमध्ये मध्य प्रदेशाच्या पूर्वोत्तर जवळ खोल उदासीनतेची स्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान या भागातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

याच दरम्यान भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी पुढील पाच दिवसांचा अंदाज x माध्यमावर पोस्ट केला आहे. त्यानुसार आज रविवार जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला होता. यानंतर पुढील चार दिवस जिल्ह्याला पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आला नाहीय.
हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला ३आणि ४ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. शनिवारी देखील जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला. यानंतर आज पहाटपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान, पावसाला जवळजवळ दोन महिने होत आले असले तरी जिल्ह्यातील बहुतांश धरणे अजून कोरडीच असल्याचे चित्र होतं. परंतु मागील काही दिवसात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक धरणांच्या जलसाठ्यात काही अंशी वाढ झाली आहे.आज रविवारी दुपारी ४ नंतर हतनूर धरणाचे १२ दरवाजे उघण्यात आले आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गिरणा धरणात आजपर्यंत अवघा १७.४५ टक्के साठा झाला. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
जळगांव जिल्हातील पर्जन्यमान MM 4/8/2024
मुक्ताईनगर -21
अमळनेर-21
यावल -48.3
जामनेर -10
एरंडोल -2
रावेर -29
चोपडा -13
चाळीसगाव -6
बोदवड-13
धरणगाव -13
भुसावळ -40.8
जळगाव -22







