महत्वाची बातमी! भुसावळ विभागातून धावणाऱ्या ३२ रेल्वे गाड्या रद्द, ८ गाड्यांच्या मार्गात बदल
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२४ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील नागपूर विभागातील कलमना स्थानकावर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या जोडणीसाठी नॉन इंटरलॉकिंगची कामे सुरू आहेत. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या ३२ रेल्वे गाड्या रद्द, ४ गाड्या शॉर्टटर्मिनेट तर ८ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.
या गाड्या रद्द
रद्द गाड्यांमध्ये १२८३४ हावडा अहमदाबाद एक्स्प्रेस (१० आणि ११ ऑगस्ट), १२८३३ अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस (१३ आणि १४), हावडा मुंबई गीतांजली एक्स्प्रेस (५, ७, ११ आणि १२), मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस (७, ९, १३ आणि १४), शालिमार एलटीटी (११ ते १७ पर्यंत), एलटीटी – शालिमार एक्स्प्रेस (१३ ते १९ पर्यंत), हटिया- पुणे एक्स्प्रेस (५ व ९ला रद्द), पुणे हटिया एक्स्प्रेस (७ व ११), भुवनेश्वर एलटीटी (८ व १५), एलटीटी भुवनेश्वर (१० व १७), हटिया एलटीटी (१६ ऑगस्ट), एलटीटी हटिया (१८), हावडा पुणे दुरांतो (१५ ऑगस्ट), पुणे- हावडा दुरांतो (१७), पुरी साईनगर शिर्डी (९ आणि १६ ऑगस्ट), साईनगर शिर्डी पुरी (११ व १८), गांधीधाम पुरी (१६), पुरी गांधीधाम (१९), ओखा बिलासपूर (१० आणि १७), बिलासपूर ओखा (१२ आणि १९), संतरागाछी पुणे (१७ ऑगस्ट), पुणे संतरागाछी (१९), हावडा साईनगर शिर्डी (८ व १५ ऑगस्ट), साईनगर शिर्डी – हावडा (१० आणि १७ ऑगस्ट), ओखा – शालिमार (१८ ऑगस्ट), शालिमार ओखा (२०), गांधीधाम – पुरी (१४), पुरी गांधीधाम (१७), पुरी सुरत (११), सुरत पुरी (१३), पुरी अजमेर (१, ५ आणि ८ ऑगस्ट), अजमेर पुरी (६, ८ आणि १३ ऑगस्ट).
या गाड्या शॉर्ट टर्मिनेट
मुंबई गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस १३ ते १८ ऑगस्टपर्यंत वर्धापर्यंत धावेल. पुढे वर्धा ते गोंदियादरम्यान धावणार नाही. गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस १४ ते १९ ऑगस्टपर्यंत गोंदियाऐवजी वर्धा येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी गोंदिया वर्धा दरम्यान रद्द राहील. कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस १२ ते १७ ऑगस्टपर्यंत वर्धा स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेशन केली आहे. ही गाडी वर्धा ते गोंदिया धावणार नाही. गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस १४ ते १९ ऑगस्टपर्यंत गोंदियाऐवजी वर्धा येथून सुटेल