जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । शिरसोली जवळील जैन व्हॅलीसमोर १५ एप्रिल रोजी झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात जखमी प्रौढाचा शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
विजय मधुकर चौधरी (वय ४५, रा. रामेश्वर कॉलनी) असे मृताचे नाव आहे. १५ रोजी चौधरी व त्यांचा मित्र चेतन रघुनाथ भावसार (रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे एमएच-१९, एआर-९३०८ या क्रमांकाच्या दुचाकीवर शिरसोलीकडून जळगावकडे येत होते. त्यावेळी समोरुन येणाऱ्या एमएच-१२, टीएच-२२९५ या इको कार चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात चौधरी व भावसार हे दोघे जखमी झाले होते. गुरुवारी चौधरी यांचा जीएमसीत मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकाविरुध्द एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली.