⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

चांदीच्या भावात सलग सहाव्या दिवशी वाढ, सोनेही वधारले ; तपासून घ्या आताचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२४ । गेल्या काही दिवसात सोन्यासह चांदीच्या दरात मोठी डोंगर गाठला आहे. चांदीच्या भावात सलग सहाव्या दिवशी वाढ कायम राहत बुधवार, २२ मे रोजी पुन्हा ७०० रुपयांची वाढ होऊन ती ९३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोन्याच्या भावात बुधवार, २२ मे रोजी १०० रुपयांची वाढ होऊन ते ७४ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.

आठवडाभरापासून चांदी दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. १४ मे रोजी चांदीच्या भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८५ हजार रुपयांवर पोहचली. १६ रोजी पुन्हा एक हजार रुपये, १७ रोजी एक हजार ४०० रुपये, १८ रोजी दोन हजार ६०० रुपयांची वाढ होऊन या दिवशी चांदीने ९० हजार रुपयांचा पल्ला गाठला. २० रोजी पुन्हा दोन हजार ५०० रुपयांची आणि २१ रोजी ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ९२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहचली.

बुधवारी भाववाढीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढून ७०० रुपयांची वाढ होऊन चांदी ९३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. दुसरीकडे मंगळवारी ८०० रुपयांची घसरण झालेल्या सोन्याच्या भावात बुधवार, २२ मे रोजी १०० रुपयांची वाढ होऊन ते ७४ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. दलालांनी चांदीची खरेदी वाढविल्याने मागणीत वाढ झाली आणि त्यामुळे चांदीचे भाव वाढत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.