राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी कल्पनाताई पाटील

ऑगस्ट 3, 2024 7:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२४ । राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी कल्पनाताई पाटील यांची निवड करण्यात आलीय. याबाबत आज पक्षाच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

rashtrwadi ncp

अजितदादा पवार गटात अद्यापही महिला जिल्हाध्यक्ष पद खाली होते. या अनुषंगाने आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कल्पना पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

कल्पना पाटील यांनी आधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध पदांवर काम केलेले आहे. त्या ग्रंथालय सेलच्या प्रदेश कार्यकारणीवर देखील होत्या. त्यांचे पुत्र अभिषेक पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली असून त्यांनी जळगाव मधून गेल्या वेळेस विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. या पार्श्वभूमीवर आज कल्पनाताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून याबद्दल त्यांचे राजकीय वर्तुळातून कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now