⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती कळविण्याचे कृषि विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती कळविण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । जिल्ह्यात सन 2020-21 करीता पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार करीता अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली आहे. या योजनेत आता अंबिया बहारा करीता मोसंबी, डाळींब, केळी व आंबा यापिकांसाठी अधिसुचित क्षेत्रात राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) आता केळी व आंबा यापिकांसाठी लागू आहे. तेव्हा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती विमा कंपनी व कृषि विभागास (तालुकास्तरावर) त्वरीत कळविणे (Intimition) आवश्यक आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन/तीन दिवसांपासून वेगाचा वारा/अवेळी पाऊसामुळे फळपिकांचे नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधीत विमा कंपनी, महसुल विभाग व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन घ्यावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.