वाघूर धरण पाणी मागणी अर्ज 5 जूनपूर्वी करण्याचे आवाहन

मे 31, 2021 3:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । वाघुर धरण विभाग, जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा यावरील प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याव्दारे (प्रवाही) तसेच अधिसुचीत/अनधिसुचित लाभक्षेत्रातील नदी-नालामधून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणाऱ्या सर्व बागायतदारांना कळविण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार उन्हाळी हंगामामध्ये 1 ते 30 जून 2021 या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा बारमाही, इतर बारमाही भाजीपाला, इतर तेलबिया, कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरिक्त उपलब्ध साठ्यातून खालील अटीस अनुसरुन पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे.

waghur dam

तरी खालील अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7 पाणी अर्जावर मागणी करुन पाणी अर्ज दिनांक 5 जून, 2021 चे आत संबंधित वाघुर धरण उपविभाग क्र. 2, वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे,

सिंचनाच्या पाणी पुरविण्यासाठी अटी व शर्ती 

खरीप हंगाम सन 2021-22 अखेर संपुर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल, मंजुर क्षेत्रासच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल, पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किवा खातेपुस्तीका उपविभागास दाखवावी लागेल, पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन अदेशानुसारच मंजुरी देण्यात येईल.

उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करुन अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे आदेश क्र. 1/2018 दि. 11 जानेवारी 2018 नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील. असे कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now