गुन्हेजळगाव जिल्हा

जळगावात ६५ कोटी रुपयांच्या बोगस बिलासंदर्भात एकाला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२४ । खोटी बिले देऊन अथवा घेवून शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्याविरूध्द महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती. तपासणी दरम्यान असे लक्षात आले की, करदाते मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी चे मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केला.

मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणामध्ये मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल ६५ कोटीची खोटी बिले देऊन शासनाची १२.६५ कोटी रुपयांची कर महसूल हानी केल्याचे उघडकिस आले आहे. या करदात्याने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे श्री. नामदेव दौलत धनगर यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत कर चुकवेगिरीसाठी दि.०१/०८/२०२४ रोजी करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान अटक करण्यात आली आहे.

या व्यक्तीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयाने १४ दिवसापर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर अटक कार्यवाही सुभाष ऊमाजी एंगडे (अपर राज्यकर आयुक्त), नाशिक क्षेत्र, नाशिक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.

या प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू असून प्रकरणांतील इतर संबंधितांवरही लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची ह्या आर्थिक वर्षातील ही ७ वी अटक असून विभागाने खोटया कर वजावटीचा दावा करणाऱ्या व खोटी बिले देऊन कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांना या कार्यवाहीतून गंभीर इशारा दिल्याचे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button