महाराष्ट्र्रात पावसाचा धुमाकूळ ! आज कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

जुलै 26, 2024 12:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाची रिपरिप सुरु असून ही पावसाची रिपरिप आणखी पुढील दोन दिवस अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे

monsoon rain

आज कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
आजही हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

उर्वरित राज्यामध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, 27 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाची रिपरिप :
जळगाव जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. दरम्यान, २७ जुलैपर्यंत असाच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. सूर्यदर्शन क्वचितच होईल. त्यानंतर पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता. दरम्यान, २७ जुलैपर्यंत ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन अत्यल्प प्रमाणात राहील. त्यामुळे वातावरणात काहीसा गारठा निर्माण होणार आहे. १ ऑगस्टपर्यंत ढगाळ वातावरण, तुरळक पावसाची अधूनमधून शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now