जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय नौदलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय नौदलामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तब्बल 741 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहे.
विशेष या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण ते पदवी पास आयटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे. खरोखर नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. याभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.
या पदांवर होणार भरती :
1) चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) 01
2) चार्जमन (फॅक्टरी) 10
3) चार्जमन (मेकॅनिक) 18
4) सायंटिफिक असिस्टंट 04
5) ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) 02
6) फायरमन 444
7) फायर इंजिन ड्राइव्हर 58
8) ट्रेड्समन मेट 161
9) पेस्ट कंट्रोल वर्कर 18
10) कुक 09
11) मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) 16
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electronics/ Mechanical/ Computer)
पद क्र.3: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) B.Sc (Physics/Chemistry/Electronics/Oceanography) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/Ship Fitter) (iii) Auto CAD
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण
भरतीसाठी वयाची अट काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि पदानुसार कमाल 25/27/30 असावे. 2 ऑगस्ट 2024 रोजी वयाची गणना केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेतही सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
अर्ज शुल्क- सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 295 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसह महिला उमेदवार विनामूल्य फॉर्म भरू शकतात.
निवड प्रक्रिया- लेखी परीक्षा, पीएसटी, दस्तऐवज पडताळणी इत्यादी टप्प्यांद्वारे या भरतीमध्ये उमेदवारांची निवड केली जाईल.
किती पगार मिळेल :
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) – 35,400/- ते 1,12,400/-
चार्जमन (फॅक्टरी) -35,400/- ते 1,12,400/-
चार्जमन (मेकॅनिक) -35,400/- ते 1,12,400/-
सायंटिफिक असिस्टंट -35,400/- ते 1,12,400/-
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) – 25,500/- ते 81,100/-
फायरमन – 19,900/- ते 63,200/-
फायर इंजिन ड्राइव्हर – 21,700/- ते 69,100/-
ट्रेड्समन मेट – 18,000/- ते 56,900/-
पेस्ट कंट्रोल वर्कर -18,000/- ते 56,900/-
कुक – 19,900/- ते 63,200/-
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) -18,000/- ते 56,900/-
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा