महाराष्ट्रातील आजचा पावसाचा अंदाज जारी ; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

जुलै 13, 2024 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२४ । राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला असून यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

rain jpg webp

सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे घाटमाथा ओलांडून पाऊस महाराष्ट्रात दाखल होत आहे. परिणामी आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
आज पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी कऱण्यात आला असून वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जळगावला १४ आणि १५ जुलैला येलो अलर्ट?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात पावसाने हजेरी हजेरी लावली. मात्र मागील बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. परंतु पावसाने हुलकावणी दिली. दरम्यान, उद्या १४ आणि १५ जुलै रोजी जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now