जळगाव जिल्हा

अबकी बार ४५ अंश पार, झाडे लावा झाडे जगवा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोस्टरमधुन जलसा व्हेजची नागरिकांना आर्त हाक

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२४ । तुम्ही कधी आकाशवाणी चौकातील जलसा व्हेज रेस्टारंट मध्ये जेवायला गेलात तर प्रवेशाव्दारा जवळच तुमची पाउले थबकतील याला कारण आहे प्रवेशव्दारावरील अबकी बार ४५ अंश पार पोस्टर या पोस्टरच्या माध्यमातून सामाजिक दायीत्वाची जाणीव असलेले जलसा व्हेजचे संचालक जितेंद्रभाई कांकरीया यांनी प्रत्येक ग्राहकाला एक नम्र विनंती करण्याचा प्रयत्न करत आहे.

जळगावकरानों या वर्षीचे तापमान ४५ अंशच्या पुढे गेले ते आपण अनुभवले व त्रासही सहन केला. येणा—या काळात यापेक्षाही जास्त उष्ण तापमानाचा असेल पर्यावरण तज्ञांच्या मते संपुर्ण जग विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असले तरीही निसर्ग मात्र त्यात होरपळला जात आहे. निर्सगाचा समतोल राखण्याची जबाबदारी आपलीच आहे.. आपणाकडे एकच विनंती की झाडे लावा झाडे जगवा किमान दोन झाडे आपल्या परिसरात लावावी व जगवावी. निसर्गाच्या रूपाने अनमोल देणं आपल्याला मिळालं पर्यावरण संवर्धनासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज केलेल्या प्रयत्नाने पुढच्या पिढीचे आयुष्य सुखकारक होईल असा संदेश यातून देण्यात आलेला आहे.

शेरू मोती राणी यांच्या पिण्यासाठी पाणी, पाणपोई, राम मंदीर प्रतिष्ठा,संत प्रदिप मिश्रा यांचे प्रवचन ऐकून आलेल्या तहानलेल्या नागरिकांना पाणी वाटप, उन्हाळयात परळ वाटप, धार्मिक सण उत्सवात ग्राहकांना मिठाई, सेल्फी पॉईंट उपलब्ध करून देत सहभाग व क्षण अविस्मरणिय बनवणारे सामाजिक दायीत्वाची जाणीव ठेवून व्यवसाय करणारे जलसा व्हेजचे संचालक जितेंद्रभाई यांनी हया जनजागृतीच्या माध्यमातून भविष्यातील धोक्याच्या घंटेची जाणीव करून देत आवाहन केले आहे. चला तर मग या पावसाळयात झाडे लावू या आणि निर्सगाचे जतन करू या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button