जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार या पदांसाठी महाभरती जाहीर केली आहे. या भरतीची अधिसूचना नुकतीच जारी झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) -4887 पदे
हवालदार (CBIC & CBN) -3439 पदे
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयोमर्यादा – एमटीएस – 18-25 वर्षे. हवालदार – १८-२७ वर्षे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात पाच वर्षांची आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट दिली जाईल. 1 जुलै 2024 पासून वयाची गणना केली जाईल.
वेतनमान
MTS वेतन – 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर-1
हवालदार पगार – 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर-1
अर्ज फी – जनरल आणि ओबीसीसाठी 100 रुपये
महिला, एससी आणि एसटी प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा