मुक्ताईनगरातील कृषि तंत्र विद्यालयात 7वी ते पदवीधरांसाठी भरती

जून 20, 2024 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही जर जॉबच्या शोधात असाल तर तुमच्या कामाची ही बातमी आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलीत, कृषि तंत्र विद्यालय, मुक्ताईनगर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

job jpg webp

विशेष सातवी पास तर पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी कुठेलीही परीक्षा घेतली जाणार नाहीय. मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाईल.

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असेल त्यांना खाली दिलेल्या पत्त्यावर मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह स्व:खर्चाने मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख २२ जून २०२४ आहे.

या पदांसाठी होणार भरती :
प्राचार्य- १ पद
कृषी पर्यवेक्षक- २ पदे
लिपिक – १
पहारेकरी- १

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
प्राचार्य : एम.एस्सी. (अॅग्री)
कृषी पर्यवेक्षक : बी.एस्सी (ॲग्री)
लिपिक : पदवीधर
पहारेकरी : 7 वी पास

मुलाखतीचे ठिकाण : श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे
मुलाखत दिनांक : 22/06/2024 रोजी ठिक 1 वाजता
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now