चोरीच्या रिक्षासह तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जून 20, 2024 2:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२४ ।जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक राहिलेला नसल्याचं दिसत आहे. अशातच घरासमोर लावलेली प्रवासी रिक्षा चोरून ती बाहेरगावी विक्री करून पसार झालेल्या जयेश परदेशी, प्रभात मानकेश्वर, ऋषिकेश बापू चित्ते (तिघे रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तिघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.

crime 2 jpg webp

तालुक्यातील कुसुंबा येथील दीपक श्रीराम मोरे यांच्या घरासमोर लावलेली त्यांची (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू २५९९) प्रवासी रिक्षा ५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक बत्तन आल्हाद यांनी पोरनि दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, किरण पाटील, नाना तायडे, शशिकांत मराठे यांचे पथक तयार केले.

ही रिक्षा गावातील जयेश परदेशी याने त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने चोरल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याच्या घरातून त्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्याकडून चोरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली. परदेशी याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच त्याचे साथीदार हे बाहेरगावी पसार झाले होते. १९ जून रोजी पसार झालेल्या प्रभात मानकेश्वर, ऋषिकेश बापू चित्ते या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या भातलल्या

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now