घसरणीनंतर जळगावात सोने-चांदी दरात पुन्हा वाढ ; आताचे भाव तपासून घ्या

जून 16, 2024 11:11 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२४ । सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरूच असून जळगाव सुवर्णपेठेत शनिवारी दोन्ही धातूंमध्ये वाढ झाली आहे. तीन दिवस स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात शनिवार, १५ जून रोजी ४०० रुपयाची वाढ झाली तर चांदीत ७०० रुपयांची वाढ झाली. यापूर्वी १४ जून रोजी चांदी ८०० रुपयांनी घसरली होती.

GL16june jpg webp

सध्या जळगावात चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मौल्यवान धातूंनी अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. गेल्या दोन आठवड्यात कोणताही उच्चांक या धातूंनी गाठलेला नाही. या आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूंचा भाव अचानक वधारला.

या आठवड्यात सोने ९०० ते १००० रुपयांनी महागले.त्यामुळे वीकेंडला खरेदीचा प्लॅन करणाऱ्या अनेकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. दुसरीकडे चांदीत ८०० रुपयापर्यंतची घसरण दिसून आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now