कुसुंबा येथे रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

जून 14, 2024 2:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२४ । शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. चंद्रकांत भावलाल पाटील (वय ४३) जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

randukar jpg webp

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत पाटील हे जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात परिवारासह राहतात. शेती काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात. कुसुंबा गावचे ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. गुरुवारी १३ जून रोजी कुसुंबा विमानतळाच्या परिसरात त्यांचे शेत शिवार आहे. या शेतात काम करीत असताना चंद्रकांत पाटील यांना १० ते १२ रानडुकरे दिसली. शेतातील पीक खराब होऊ नये म्हणून त्यांनी त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करीत पायाचा लचका तोडला.

यामुळे गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत पाटील यांना आजूबाजूच्या शेतमजूर व ग्रामस्थांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरु आहेत. दरम्यान, कुसुंबा परिसरात अनेक जंगली प्राणी असून त्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी कुसुंबा ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now