भुसावळमार्गे एलटीटी ते वाराणसी विशेष गाडी धावणार, कोण-कोणत्या स्थानकांवर थांबेल?

जून 12, 2024 12:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी या मार्गावर विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने भुसावकर प्रवाशांची सोय झाली आहे.

train jpg webp

०४२२९ क्रमांकाची गाडी एलटीटी येथून १४ जूनला दुपारी १ वाजता सुटेल. ही गाडी वाराणसीला दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. या गाडीची एक फेरी होईल. तर वाराणसी येथून ०४२३० क्रमांकाची गाडी १२ जूनला रात्री १०.२० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीची एक फेरी होईल.

या स्थानकांवर असेल थांबा :
ही गाडी जौनपूर, शहागंज, अयोध्या, अयोध्या कँट, लखनौ, कानपूर, ओराई, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, बिना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे स्थानकावर दोन्ही दिशांना थांबेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now