जळगाव जिल्हाजळगाव शहर

पाणीपुरवठा योजनांसाठी जिल्ह्यातील ‘या’ सहा गावांकरीत ९६ कोटीची तरतूद !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ६ प्रमुख गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे, चाळीसगाव तालुक्यातील टाकळी, मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व ७ गाव ग्रामीण पाणी पुरवठा योजना, तसेच भुसावळ तालुक्यातील कंडारी आणि साकेगाव या गावांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ९६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून महिना अखेरीस अजून ८ – १० मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभागाच्या योजनांना मंजुरी देण्याचा धडाका लावल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

सविस्तर असे की, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी, यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्यांतील आमदार व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार ४ – ५ दिवसांपूर्वी मंत्रालयात गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक आयोजित केली होती. त्यात जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजना ना. मंजुरी देण्याचे निर्देशही दिले होते. जिल्ह्यातील लहान मोठ्या गावांचे जास्तीत जास्त प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद व एम.जी.पी.ला दिले आहेत.

६ गावांसाठी ९६ कोटी निधीची तरतूद !

या योजनांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे – ३४ कोटी १५ लक्ष ८७ हजार, मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व ७ गाव ग्रामीण पाणी पुरवठा योजना १३ कोटी ४५ लक्ष ८९ हजार, चाळीसगाव तालुक्यातील टाकळी – २१ कोटी ३२ लक्ष रूपये ८९ हजार, भुसावळ तालुक्यातील कंडार- १७ कोटी ८९ लक्ष ९ हजार रूपये तर भुसावळ तालुक्यातील साकेगाव-८, ६२ लक्ष १५ हजार या गावांच्या योजनांचा समावेश आहे. यासाठी एकूण ९५ कोटी ४५ लक्ष ८९ हजार रूपयांच्या निधीती तरतूद करण्यात आलेली आहे.

ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अलीकडेच पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द तसेच चोपडा तालुक्यातील धानोरा या मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या आहेत. यातच आता ४ तालुक्यांमधील ६ गावांच्या योजनांना मार्ग मोकळा झाला असून याच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. तर, या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील अजून ८-१० मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button