⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोदी सरकारच्या ७ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपा जिल्हा महानगरतर्फे विविध उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी (NDA) च्या आघाडीच्या केंद्र सरकारला दि. ३० मे रोजी ७  वर्षे पूर्ण झाली.  या निमित्ताने शनिवारी भाजपा जळगावतर्फे गरीब व गरजू  दिव्यागं, मूकबधिर बाधंवान किराणा किट भाजपा कार्यालय  येथे वाटप करण्मायात आले. यावेळी माजी मंत्री आ.गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते जिलाध्यक्ष आ सुरेश (राजु मामा) भोळे,  महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सेवाकार्य सप्ताह ची सुरुवात केली.

त्या नुसार भाजपा महानगरातील ९-मंडलात कोरोना च्या  दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव ,जाहिरात बॅनर, हौरडिंग खर्च न करता सेवाकार्य च्या माध्यमातून म्युकॉर माईकोसिस (ब्लैक फंगस) आजार तपासणी, मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, रक्तदान, कोरोना अॅटीजन तपासणी शिबिर, वृक्षारोपण, किराणा कीट वाटप या माध्यमातून  नरेंद्र मोदी सरकारच्या ७ व्या वर्षपृरती कार्यक्रम सेवाकार्य करून शहरातील ९ मंडलात  साजरा केला.

“म्युकॉर माईकोसिस (ब्लैक फंगस) हा Post-Covid, व मधुमेह पेशेंट्स साठि  २-३ महीन्यात होण्याची शक्यता जास्त असते त्यानुसार आज दि ३० सकाळी १०:०० वजेपासून सृष्टि हॉस्पिटल येथे भाजपा मंडल-४ येथे  निशुल्क चेकअप कैंप डॉ गोविंद मंत्री,MDS (मुखरोग तज्ञ),डॉ अक्षय सरोदे, MS*,(नाक,कान,घसा तज्ञ),यांचे  मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा महानगर अध्यक्ष   दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, यांच्या हस्ते जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉक्टर राधेश्याम चौधरी, भगतसिंह निकम, नगरसेवक अमित काळे, प्रसिद्धीप्रमुख मनोज भंडारकर, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, धीरज वर्मा मंडळ सरचिटणीस, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली. नाक, कान, घसा तज्ञ डॉक्टर श्री अक्षय सरोदे व दंत-मुखरोग तज्ञ डॉक्टर गोविंद मंत्री यांनी श्री राधेश्याम चौधरी यांच्या सृष्टी हॉस्पिटल येथे पोस्ट-कोविड  रूग्णांना म्युकॉर मायकोसिस संबंधी जनजागृतिपर मार्गदर्शन केले. नंतर रूग्णांची मोफत तपासणी करून खबरदारीसाठीचे उपायही सुचवले.

तसेच महानगरातिल मंडल निहाय  कार्यक्रम आयोजित करण्यात आले ते पुढील प्रमाणे

मंडल क्र.१ शिवाजी नगर  कोरोना अंटिजेन तपासणी.

अँटी जन चाचणी शिबीर घेण्यात आले शिवाजीनगर मध्ये श्री मोटर्स इथे कॅम्‍प घेण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी मंडल अध्यक्ष श्री रमेश जोगी, नगरसेवक राजेंद्र मराठे, सरचिटणीस शांताराम गावडे, संजय शिंदे ,विशाल वाणी, नरेंद्र भोजनाला दिनेश पुरोहित, सचिन धनगर ,संदीप पवार, योगेश चौधरी ,गणेश जोगी ,अरुण भोई ,लोकेश नारखेडे आदी

मंडळ-३ आयोधया नगर, अंटिजेन तपासणी , श्रीराम मंदिर,

किसन मराठे सरचिटणीस, सौ.रंजनाताई वानखेडे,माहनगर चे उपअध्यक्ष श्री प्रदिपभाऊ रोटे,चिटणीस विठ्ठलभाऊ पाटील,यांच्या उपस्थित तर महानगरपालीके चे डाॅ.संजय पाटील,कुलकर्णी मॅडम, दायमा मॅडम,सुयश ठाकुर,विजयभाऊ वानखेडे,गुड्डुभाई पठाण,

मंडळ-४   “म्युकॉर माईकोसिस (ब्लैक फंगस) तपासणी.

मंडळ-५ पिंप्राळा परिसर रक्तदान शिबिर. 

शक्ती महाजन, नगरसेवक आबा कापसे, विजय पाटील, डॉक्टर सोमानी, प्रवीण जाधव, नितु परदेशी, छाया सारस्वत, महेश ठाकूर, जिभाऊ वानखेडे, नूर भाई, उमेश सूर्यवंशी, योगेश गोसावी धीरज कोलते, आदी

मंडल-७ सिंधी कॉलनी

कार्यक्रम स्वरूप – म्युकॉर मायसीस जनजागृती अभियान

ठिकाण – डॉ.धर्मेंद्र पाटील यांचे हॉस्पिटल,

सुशील हस्वनी, संजय लुल्ला, आदी

मेहरूण मंडल क्र.8 मध्ये, गवडीवाडा,  येथे  कोरोना तपासणी शिबिर

जेष्ठ नगरसेवक मा. श्री सदाशिवराव ढेकळे, मंडल अध्यक्ष मा. श्री विनोद मराठे, मंडल सरचिटणीस मा. श्री दिपक बाविस्कर,शक्ती केंद्र प्रमुख मा. श्री निलेश घुगे पाटील,महिला आघाडी अध्यक्ष मा सौं जोतीताई बर्गे, सरचिटणीस मा. सौं सरिता बारी,आदी

मंडल क्र.९ – महाबळ परिसर

कार्यक्रम स्वरूप –औषधी वाटप, व स्वच्छता अभियान

ठिकाण – समता नगर

निलेश कुलकर्णी आदी,