जुन्या वादातून ७७वर्षीय वयोवृद्धाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । बोरनार येथे जुन्या वादातून ७७ वर्षीय वयोवृध्दाला शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

crime 8

तालुक्यातील बोरनार येथील रहिवाशी पिंताबर झिंपरू चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून बुधवार २५ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांचे शेजारी राहणारे इब्राहिम इसाखॉ कुरेशी याने पितांबर चौधरी यांना शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबबात पितांबर चौधरी यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून इब्राहिम इसाखॉ कुरेशी रा. बोरनार ता.जि.जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे. दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now