जळगाव जिल्हा

गेल्या वर्षीच्या तुलनेने जिल्ह्यातील धरणांमध्ये ७ टक्के पाणीसाठा कमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । यंदा राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने अनेक धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षाच्या तुलनेने धरणात ७ टक्के पाणीसाठा कमी असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात लहान मोठे असे एकूण १३ मध्यम प्रकल्प असून यामध्ये गेल्यावर्षी १२ जुलैपर्यंत ४०.६७ टक्के पाणीसाठा होता. तर सद्यःस्थितीला या प्रकल्पामध्ये ३३.११ टक्के उपयुक्त साठा आहे. जर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट येऊ शकते.

जिल्ह्यात तीन मोठे, तर १३ मध्यम प्रकल्प आहेत. यांची एकूण क्षमता ही १४२७ दलघमी म्हणजेच ५० टीएमसी इतकी आहे. सद्यःस्थितीला या प्रकल्पांमध्ये एकूण ४७२.६० दलघमी अर्थात १६.६९ टीएमसी इतका उपयुक्त जलसाठा आहे. जूनमध्ये पाऊस बरसला. मात्र, जुलैत पावसाने दडी मारल्याने गेल्यावर्षांच्या तुलनेने पाणीसाठा कमी असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यातील पाच मध्यम लघु प्रकल्प पन्नाशीच्या वर आहेत, तर निम्म्या जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात ३४.११ टक्के, तर वाघूरमध्ये ६२.५ टक्के साठा आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील गिरणासह वाघूर अन्य प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिल्हातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले होते. 

परंतु यंदा पावसाने ओढ दिल्याचे दिसून येत असून जर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट येऊ शकते. दरम्यान, तापीला पूर आल्याने हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्यात अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यातही १२ जुलै पर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु पावसाने ओढ दिली आहे. रोज ढग दाटून येत आहे. मात्र, पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.  त्यामुळे प्रकल्प ही पूर्ण क्षमतेने भरून रब्बी हंगाम बहरण्यास मदत होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button