शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का ; 66 नगरसेवक शिंदे गटात दाखल

जुलै 7, 2022 12:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । शिवसेनेला (Shivsena) सत्ता गेल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के यांचा देखील समावेश आहे. या माजी नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन भेट घेतली व शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

shivsena jpg webp

सध्या ठाणे महापालिकेवर कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या पंचवार्षिकला ठाणे महापालिकेत शिवसेनेचे एकूण 67 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील 66 नगरसेवक शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. 67 नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच आहेत. या माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बंडानंतर आता शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांसमोर गड राखण्याच मोठं आव्हान असणार आहे. कारण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ओळख वनमॅन आर्मी अशीच होती. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात शिवसेनेचा नवा चेहरा कोण हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now