⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ विभागातील ६ रेल्वे गाड्या सुरतऐवजी ‘या’ स्थानकापर्यंत धावणार

भुसावळ विभागातील ६ रेल्वे गाड्या सुरतऐवजी ‘या’ स्थानकापर्यंत धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२४ । सुरत स्थानकावर फलाट चारवरील ट्रैफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. यामुळे सुरत रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि सुरतपर्यंत धावणाऱ्या भुसावळ विभागातील ६ गाड्या सुरतऐवजी उधना येथून सुटतील. सुरतऐवजी उघना स्थानकापासून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये १९००७ सुरत भुसावळ पॅसेंजर (८ ते ३० सप्टेबर) उधना येथून सायंकाळी ५.२४ वाजता सुटेल.

१९००५ सुरत-भुसावळ एक्सप्रेस रात्री ११.३० ( वाजता, ०९०६५ सुरत-छपरा विशेष गाडी सकाळी ८.३५ वाजता, १९०४५ सुरत-छपरा ताप्तीगंगा एक्सप्रेस सकाळी १०.२० वाजता, २२९४७ सूरत-भागलपुर सुपरफास्ट एक्सप्रेस (१० ते २९ सप्टेबर) सकाळी १०.२० वाजता, २०९२५ सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस दुपारी १२.३० वाजता सुटेल.

शॉर्ट टर्मिनेट गाड्या
१९००७ भुसावळ – सुरत एक्सप्रेस (८ ते ३० सप्टेंबर), १९००६ घुसावळ सुरत एक्सप्रेस, अमरावती – सुरत सुपरफास्ट, ०९०६६ छपरा-सुरत विशेष गाडी (११ ते २५ सप्टेंबर), १९०४६ छपरा-सुरत ताप्तीगंगा एक्सप्रेस (२९ सप्टेंबरपर्यंत), २२९४८ भागलपूर सुरत सुपरफास्ट ३० सप्टेंबरपर्यंत सुरतऐवजी उधनापर्यंतच धावेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.