भुसावळात ४७ वाहन चालकांवर दंडाची कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । भुसावळ शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी नाहाटा काॅलेज, हंबर्डीकर चाैक, बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर थांबून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. मंगळवारी ४७ वाहन धारकांकडून प्रत्येकी २०० रूपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यात प्रामुख्याने वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे, नियमबाह्य वाहतूक होणारी ठिकाणे हेरून कारवाई केली जाते. दरम्यान, वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनांवर कारवाई करत असले तरी देखील मंगळवारी दुपारी १२.३० वाजता पांडुरंग टाॅकीजजवळ दहा मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. येथे एकेरी मार्ग सुरू असल्याने येथे वारंवार ही समस्या उद््भवते. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांमुळे अडचणीत भर पडते. या वाहन चालकांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी पादचारी, दुकानदारांकडून होताना दिसते.