गुन्हेजळगाव शहर

बनावट कागदपत्रांद्वारे ४५ लाखांचा गंडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । शहरातील एमआयडीसी परिसरातील एक्स ३२ सेक्टर मधील विजय ऍग्रो सेंटरमधे एकाने बनावट फॉर्म तयार करून तब्बल ४४ लाख ७३ हजार ६२८ रुपयांची फसवणून केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन जगदीश कुलकर्णी (वय ४२, रा.आनंद नगर, जळगाव) हे या कंपनीचे मालक असून त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. विजय ऍग्रो सेंटर येथे गोडावून किपर म्हूणन काम करणारे संशयित आरोपी पंकज नितीन पाटील रा. जगवाणी नगर, जळगाव याने फिर्यादीस विश्वासघात करून कंपनीचे बनावट फॉर्म तयार करुन ४४ लाख, ७३ हजार, ६२८ रुपये किंमतीच्या विविध विद्राव्य खते, बियाणे तसेच किटकनाशके या मालाचा अपहार केला.

या प्रकरणी कुलकर्णी यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी पंकज नितीन पाटील याच्याविरुद्ध भादंवि कलम ४०८,४०६५,४०६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रवींद्र गिरासे करत आहेत.

Related Articles

Back to top button