आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारनं घेतले मोठे ४ निर्णय

मे 26, 2026 2:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२६ । राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज २६ मे रोजी मंत्रालयात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चार महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहे. त्यात कोकण रेल्वेचे शिल्पकार स्व. मधु दंडवते यांच्या स्मृतींना उजाळा देत सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

mantralay fadanvis

या बैठकीत परिवहन, सामान्य प्रशासन, उद्योग आणि महसूल विभागाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील बदल्यांना कायदेशीर सुधारणेद्वारे मुदतवाढ देण्यात आली.

मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय ?

नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करावी लागणार. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता.
(महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग)

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार.
(परिवहन विभाग)

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता.
(उद्योग विभाग)

शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now