जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । तामसवाडी ( ता.पारोळा ) येथील विकास पवार यांच्या मालकीचे ४ गुरे अज्ञात चाेरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार १ जानेवारीला मध्यरात्री घडला. या प्रकणारी पवार यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत गुन्हा करण्यात आला.
बाजारभावाप्रमाणे या गुरांची ४० हजार रुपये किंमत आहे. २ जानेवारीला पवार गाेठ्यात गेले असता त्यांना गुरांची चाेरी झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी पाराेळा पाेलिसांत अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- धक्कादायक ! बनावट सही- शिक्क्यांद्वारे तयार केले नियुक्तीपत्र; भुसावळच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
- Erandol : लग्नाची हळद फिटण्याआधी नववधूने सोडले जग ; दुर्दैवी मृत्यूमुळे लग्नघरात शोककळा
- Erandol : मासे पकडल्यानंतर घरी परतत काळाचा घाला ; अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
- बस स्थानकात पर्स लांबवणाऱ्या ६ महिला जेरबंद
- वृद्धेची चेन लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात