जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । पाचोरा तालुक्यातील एका गावात जागेच्या वादावरुन चौघांनी ३८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला.
तालुक्यातील एका गावात राहणारी ३८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील जागेचा वाद सुरू असल्यामुळे ३०एप्रिल रोजी रात्री ८ वाजता गल्लीतील उत्तम फुला बागुल, इंदुबाई उत्तम बागुल, दीपक गौतम बागुल आणि संगीता उत्तम बागुल या चौघांनी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहे.