⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पद्मालयच्या उपसा सिंचन योजनेच्या विकास कामासाठी 371 कोटी, आ. चिमणराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । एरंडोल पदमालय क्र. २ साठवण तलाव व उपसा सिंचन योजनेच्या ३७१ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता मागील आठवड्यात आमदार चिमणराव पाटील यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्प पळासदळ व पद्मालय क्रमांक २ साठवण तलाव व उपसा सिंचन योजना या दोन्ही अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावांना चालना देण्यासाठी मागणी केली सातत्याने गेल्या तीन-चार वर्षांपासून पाठपुरावा करून या दोन्ही प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते मागील आठवड्यात अंजनी मध्यम प्रकल्पाच्या २३२ कोटींच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी पद्मालय २ साठवण तलाव व उपसा सिंचन योजनेच्या ३७१ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी एरंडोल विश्रामगृहावर बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र दोधू चौधरी. आनंदा रामदास चौधरी, शालिग्राम गायकवाड ,चिंतामण पाटील. कृष्णा ओतारी. मयूर महाजन. संभाजी पाटील. बापू ठाकूर. विठ्ठल वंजारी .राजू महाजन रवींद्र जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते

पदमालय दोन साठवण तलाव व उपसा सिंचन योजना एरंडोल तालुक्यातील दौलतपुरा येथे प्रस्तावित आहे या योजनेअंतर्गत गिरणा नदीवरील दहिगाव बंधाऱ्यातून पावसाळ्यातील पुराचे पाणी एम एस पाईपाच्या रायझिंग मेनद्वारे उपसा करून पद्मालय दोन येथे धरण बांधून त्यात पाणीसाठा करणे व त्याद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे या धरणाची साठवण क्षमता ७०.३६ द.ल. घ.मी .आहे या धरणातून दोन प्रकारे सिंचन करणे प्रस्तावित आहे एरंडोल तालुक्यातील ३५३३ हेक्टर १६ गावे व धरणगाव तालुक्यातील ५४६७ हेक्टर हे १७ गावांना सिंचनाच्या लाभ होणार आहे

बंदिस्त नलिका वितरण प्रणाली द्वारे दोन हजार एकर वर एरंडोल तालुक्यातील नागदुली. खेडगांव.खडके बु. पिंपळकोठा खुर्द चोरटकी .वरखेडी.व धरणगांव तालुक्यातील पथराड खुर्द.पथराड बु.शेरी या गावांना सिंचनाच्या लाभ मिळणार आहे गिरणा प्रवाही कालवा स्थेईरीकरणद्वारे ७००० हेक्टरवर एरंडोल तालुक्यातील खर्ची बुद्रुक .रिंगणगाव .दापोरी. खेडी खुर्द. वैजनाथ.रवंजे पिंपळकोठा प्रचा.सावदेप्रचा.कढोली. खर्ची खुर्द तर धरणगाव तालुक्यातील टाकळी बुद्रुक. टाकळी खुर्द. पारधी बुद्रुक पाळधी खुर्द .भोकनी. वंजारी. बांभोरी .एक लग्न. लाडली. धार. दोणगाव .फुलफाट .चांदसर या गावांची शेतजमीन ओलिताखाली येणार आहे

या योजनेमुळे एरंडोल व धरणगाव तालुक्यातील नऊ हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने आमदार चिमणराव पाटील यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याची ही फलश्रुती आहे अंजनी मध्यम प्रकल्प व पद्मालय दोन साठवण तलाव व उपसा सिंचन योजना या दोन्ही प्रकल्पांमुळे एरंडोल तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोनेरी पहाट उजळणार आहे सिंचन लाभामुळे सर्वत्र हरितक्रांती होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात सुख व समृद्धी निर्माण होणार आहे दरम्यान आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस या दोघा नेत्यांचे आभार मानले आहे या दोन्ही प्रकल्पांसाठी भरगोच निधी उपलब्ध झाल्याबद्दल तालुक्यातील नागरिक आमदार चिमणराव पाटील यांना धन्यवाद देत आहेत

आमदार चिमणराव ठरताहेत पाणीदार

आमदार चिमणराव पाटील यांनी अंजनी मध्यम प्रकल्प व पद्मालय दोन साठवण तलाव या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ६०० कोटी पेक्षा अधिक निधी शासनाकडून मंजूर करून आणला या त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे चिमणराव पाटील हे केवळ आमदार नसून ते आता आमदारकी बरोबर पाणीदार नेते अशी त्यांची नवीन ओळख होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून अंजनी धरणात पाणीसाठा निर्मिती होत होती परंतु कालवा प्रणाली अभावी सिंचनाच्या पुरेशा प्रमाणात लाभ होऊ शकत नव्हता मात्र आता अंजनी धरणातील जलसाठ्याचे पाणी शेतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे