जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । जळगाव शहरात चोरीच्या घटना वाढतच असून अशातच बाहेरगावी गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या घरात चोरी झाली आहे. जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंप परीसरातील शिवराणा नगरात राहणारे सेवानिवृत्त कर्मचार्यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड, टीव्ही, मोबाईलसह 36 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील शिवराणा नगरात उमंग सिमंग भगवानसिंग पाटील (61) हे पत्नी , मुलगा व सुन या परीवारासह वास्तव्यास आहेत. 15 जानेवारी रोजी कुटुंबासह उमंग पाटील हे खाजगी कामानिमित्ताने पुण्याला गेले होते. 20 जानेवारी रोजी ते पुण्यावरुन घरी परतले. यावेळी त्यांना घराला लावलेल कुलूप दिसले नाही. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. घरात पाहणी केली असता चोरी झाल्याची खात्री झाली.

चोरट्यांनी उमंग पाटील यांच्या घरातून 10 हजारांचा एलईडी टीव्ही, 20 हजाररुपये रोख, फोन, ब्लुटूथ स्पीकर, ट्रॅव्हलिंग बॅग असे 6 हजारांचे साहित्य असा एकूण 36 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे समोर आले. याप्रकरणी उमंग पाटील यांनी रविवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
हे देखील वाचा :
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन
- जळगाव शहर पोलिसांची चोरीच्या गुन्ह्याचा छडा; तीन आरोपी अटकेत, १० हजारांची रोकड जप्त
- त्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे ; आसोदा पुलावरून मंत्री गुलाबराव पाटील कडाडले
- निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
- मुक्ताईनगरातील ट्रॅव्हल्समधील डिझेल चोरीचा उलगडा, भिवंडीतील दोन आरोपी जेरबंद










