जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२। येथील दौलत नगरातील बंद घर फोडून घरातील ३० हजार रुपयाची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक असे कि, दौलत नगरीतील रहिवासी भास्कर शंकर पाटील (वय-६४) रा. सुदर्शन अपार्टमेंट हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १ एप्रिल रोजी ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत ३० हजाराची रोकड चोरून नेल्याचा प्रकार मंगळवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीला आला. या घटने संदर्भात पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीवरून रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ हे करीत आहेत.










