भुसावळ-भादली दरम्यान ब्लॉक ; आजपासून दोन दिवस ‘या’ 30 रेल्वे गाड्या रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२३ । रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच भुसावळ-भादली दरम्यानच्या ब्लॉकमुळे भुसावळ मार्गे धावणाऱ्या तब्बल 30 रेल्वे गाड्या रद्द आजपासून दोन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. 17 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत शिवाय सहा गाड्या या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ-भादली दरम्यानच्या रेल्वेच्या चौथी लाईनीची चाचणी सेप्टी कमिश्नर आज, गुरूवार, शुक्रवारी करीत असल्याने व याच काळात यार्ड रीमोल्डींगमुळे रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या ब्लॉक घेतला आहे. 30 आणि 31 मार्च असा 2 दिवस ब्लॉक असणार असून त्याचा रेल्वे गाड्यांवर परीणाम होणार आहे. ब्लॉकमुळे आजपासून पुढील दोन दिवस तब्बल 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

तर 17 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत शिवाय सहा गाड्या या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आधीच उन्हाळ्यामुळे प्रवासी घामाघूम झाले असताना अचानक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांधून संतप्त सूर उमटत आहे. रद्द गाड्यांमध्ये भुसावळ-कटनरी, ईटारसी मेमू, देवळाळी एक्स्प्रेस, सुरत-अमरावती आदी गाड्यांचा समावेश आहे.

रद्द झालेल्या गाड्या

अमरावती – पुणे एक्स्प्रेस – ३० मार्च
सुरत – अमरावती एक्स्प्रेस – ३० व ३१ मार्च
अमरावती – सुरत एक्स्प्रेस – ३१ मार्च व १ एप्रिल
अहमदाबाद – नागपूर एक्स्प्रेस – ३० मार्च
पुणे – नागपूर एक्स्प्रेस – ३० मार्च
नागपूर – पुणे एक्स्प्रेस – ३१ मार्च
भूसावळ – वर्धा एक्स्प्रेस – ३१ मार्च
वर्धा – भूसावळ एक्स्प्रेस – ३१ मार्च
गोंदिया – कोल्हापूर एक्स्प्रेस – ३१ मार्च