जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील सावदा, भुसावळ, आणि जामनेर या ठिकाणी प्रत्येकी एक-एक असे भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध विजयी झाले. यामुळे राज्यात भाजपचं पहिलं खातं उघडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथे प्रभाग 7 ब मधील प्रीती मुकेश पाटील, सावदा येथील प्रभाग 7 मधील रंजना भारंबे आणि जामनेर येथील प्रभाग 11 ब मधील उज्वला दीपक तायडे हे भाजप उमेदवार बिनविरोध ठरले. याबाबत अधिकृत घोषणा मात्र माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर करण्यात येणार आहे.

या ठिकाणी महाविकास आघाडीला झटका बसल्याच बोललं जात आहे







