स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी तरुणांना दान म्हणून मागितले ‘हे’
जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या 32 व्या पुण्यस्मरणार्थ वेरूळ येथे आयोजित आला होता. यावेळी जय हनुमान धर्म संस्कार सोहळ्याप्रित्यर्थ जळगाव जिल्हा भक्तीफेरी निमित्ताने जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे संपूर्ण जिल्हाभर दर्शन सोहळे, पालखी मिरवणूक, स्टेज कार्यक्रम, मोठ्या उत्साहाने आणि भक्तीमय वातावरणात दिनांक 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत पार पडले.
भक्ती फेरी निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गावागावांमध्ये पालखी मिरवणुकीने स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे स्वागत झाले. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी यज्ञ, अनुष्ठान, अन्नदान, अभिषेक इ. परंपरेचे महत्व सांगताना वर्तमानातील तरुणांच्या व्यसनाकडे देखील विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांचे कार्य खूप मोठे असून आतापर्यंत अध्यात्माच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना व्यसन मुक्त केले आहे. तसेच सन्मार्गाला लावले आहे स्वतः स्वामी शांतिगिरीजी महाराज एक त्यागी, तपस्वी आणि विरक्त संत आहेत. गेल्या 45 वर्षापासून फक्त फलाहार, 9 वर्ष मौनसाधना, स्त्रियांना लांबुन दर्शन, जमिनीला चरणस्पर्श न करणे, पैशाला स्पर्श न करणे,गवताची कुटिया, बारदानाचे कपडे फक्त इ.वापर, रोज पहाटे 4 वाजेपासून आपला दिनक्रम सुरू करणे. इत्यादी सह अनेक कठोर नियम स्वामी शांतिगिरी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अखंड चालू ठेवले आहे.
उपस्थित भाविकांमधून सर्व तरुणांना मंच समोर उभे करून प्रामाणिकपणे सर्वांनी आपले व्यसन श्री बाबाजींचा चरणी अर्पण करावे हेच दान आज स्वामी शांतिगिरीजी महाराज तुमच्याकडे मागणार आहे. असे महाराजांच्या वतीने सांगण्यात आले. आणि भविष्यात आपण कुठल्याही प्रकारचे व्यसन करणार नाही. आयुष्यभर निर्व्यसनी म्हणून जीवन जगू तसेच चांगल्या मित्रांची संगत धरू. असा संकल्प देखील सर्व तरुणांकडून स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी करून घेतला. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक आहे. आपले म्हातारपण चांगले जावे असे ज्या पालकांना वाटत असेल त्यांनी योग्य वयातच आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवणे. असे यावेळी सांगण्यात आले. .