जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । महाराष्ट्रातील ख्यातनाम लोकशाहीर संभाजी भगत यांच्या “विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा” या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन पाचोरा येथील टाऊन हॉल शेजारील मानसिंका मैदानावर करण्यात आले आहे.
पाचोरा नगरपालिका कर्मचारी पतसंस्था व क्षत्रिय ग्रुप यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त पोवाड्यांच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचार मांडणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम लोकशाहीर संभाजी भगत यांच्या “विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा” या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन केले असून रविवारी दि. १ मे रोजी पाचोरा शहरातील टाऊन हॉल शेजारील मानसिंगका मैदानावर संध्याकाळी ८ वाजता होणाऱ्या या रंगतदार शाहिरी जलसा कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे. संभाजी भगत यांची मांडणी व सादरीकरणाची अनोखी तऱ्हा महाराष्ट्रभर अत्यंत लोकप्रिय असुन त्यांच्या कार्यक्रमासाठी कायमच जनतेतून मोठी उत्सुकता दिसून येते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपालिका आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, खलील देशमुख, राजेश कंडारे, पप्पू राजपूत, प्रा. गणेश पाटील, रणजीत पाटील, सुधीर पाटील, अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार, संजय जडे, सुनील शिंदे, सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे यांचे सह नगरपालिका कर्मचारी, पतसंस्था व क्षत्रिय ग्रुप पदाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान सकाळी पी.बी.सी. मातृभूमी कार्यालयात दि. १ मे रविवारी सकाळी ११ वाजता संभाजी भगत यांचा संविधान सन्मान, सुरक्षा व संवर्धन मोहिमे अंतर्गत महाजागरात “संविधान जागरात बुद्धिजीवींची भूमिका व वर्तमान परिस्थिती” या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले असून यासाठी शहरातील संविधान प्रेमी बुद्धिजीवी नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे तथा संविधान प्रबोधक, व फुले शाहू आंबेडकरी प्रबोधिनीचे जय वाघ यांनी केले आहे.