⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

मुंबईत मध्य रेल्वेवर २७ तासांचा जम्बोब्लॉक, ३६ गाड्या रद्द तर अनेक गाड्या शॉर्ट टर्मिनेट

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । मुंबईत कर्नाक रोड ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक दि.१९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही. तसेच ३६ मेल आणि एक्सप्रेस गाड्या देखील रद्द असणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाक रोड ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक १९ ते २१ म्हणजेच शनिवारी, रविवार, सोमवार नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री ११ ते सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि सीएसएमटी दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि सीएसएमटी उपलब्ध राहणार नाहीत.

मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील. तसेच हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जाणार आहे. तर रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील.

३६ मेल, एक्स्प्रेस गाड्या असणार रद्द
दि.१९ नोव्हेंबर रोजी 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस,12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस, 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस, 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे, 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस,17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, 12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ रद्द असणार आहे.

दि.२० रोजी 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस, 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस आणि 12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस,12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ,11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस, 02101 मुंबई – मनमाड विशेष,12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे, मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस, मुंबई – पुणे डेक्कन क्वीन, 12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस, 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस, 17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस, 11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन, 12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस, 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे, 02102 मनमाड – मुंबई स्पेशल, 12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस,17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस, 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस, 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आणि 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस 20 नोव्हेंबर 2021 रोजी रद्द असणार आहे.

दि.२१ नोव्हेंबर रोजी 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस, 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस आणि 11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस रद्द असणार आहे.

३५ रेल्वे गाड्या दादर, पनवेल आणि पुण्यावरून धावणार
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या ३५ पेक्षा जास्त मेल- एक्सप्रेस गाड्या दादर, पुणे आणि पुणे रेल्वे स्थानकांवरून सुटणार आहे. ज्यामध्ये मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस, मुंबई – अमृतसर एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस, मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस सारख्या अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर रेल्वे स्थानकांवरून धावणार आहे. तर मुंबई- केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, मुंबई- तिरुवनंतपुरम एक्सप्रेस, मुंबई- गदग एक्सप्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस पुण्यावरून धावणार आहे.

३३ मेल-एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट
सीएसएमटीकडे येणाऱ्या ३३ मेल- एक्सप्रेस गाड्या ह्या दादर, पुणे, नाशिक रोड आणि पनवेलपर्यंतच धावणार आहे. ज्यामध्ये पुष्पक एक्सप्रेस, हावडा – मुंबई एक्सप्रेस, अमृतसर एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस पंजाब मेल, जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, बिदर – मुंबई एक्स्प्रेस, नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस मांडवी एक्सप्रेस सारख्या महत्वपूर्ण गाड्यांचा समावेश आहे.