जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । जळगावातील विजय नगरातील एका २६ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आलीय. पल्लवी महेश पाटील (वय-२६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, शहरातील पिंप्राळा परिसरातील विजय नगरातील पल्लवी पाटील हे पती महेश हेमलाल पाटील यांच्यासह सासू-सासरे व पाच वर्षाची मुलगी यांच्यासह वास्तव्याला आहे. पती महेश पाटील हे शहरातील दाणाबाजार मार्केट मधील जळगाव पीपल्स बँकेत क्लार्क म्हणून नोकरीला आहे. तर पल्लवी पाटील ह्या राहत्या घरात खाजगी शाळा सुरू करून उदरनिर्वाह करतात.

दरम्यान, बुधवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पती महेश पाटील हे कामावर निघून गेले. दरम्यान पल्लवी पाटील यांनी घराच्या मागच्या रूममध्ये सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावातील निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; तात्काळ KYC पूर्ण करा, अन्यथा..
- पारोळ्यातील बाधित भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह जलसंपदा मंत्र्यांनी केली पाहणी
- अनुसूचित जाती व नवबौद्ध बचतगटांसाठी खुशखबर; मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ९० टक्के अनुदान
- जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन










