यावलमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

एप्रिल 28, 2021 1:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । यावल शहरातील श्रीराम नगरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आलीय. कन्हैय्या रामचंद्र मेढे (वय-२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

crime

याबाबत असे की, यावल शहरातील श्रीराम नगर परिसरात राहणारा कन्हैय्या मेढे या तरूणाने आज सकाळी १० वाजता राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत गोकूळ मेढे यांच्या खबरीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. नितिन चव्हाण करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now